Rakhi Sawant Health Update: बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत हिची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. छातीत दुखण्यासोबतच पोटात गाठी असल्याने राखीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर नेटकरी हा राखीचा नवा ड्रामा असावा, असं म्हणत आहेत. मात्र, यावेळी राखी सावंतसोबत ‘लांडगा आला रे आला’ अशी गत झाली असल्याचे तिचा पहिला पती रितेश याने म्हटले आहे. पाहा काय म्हणाला...