Rajinikanth: भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. उत्तर भारताच्या दौऱ्यावर असलेल्या रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी जाऊन काही वेळ चर्चा केली. यावेळी आदित्यनाथ यांनी रजनीकांत यांना पुस्तक आणि स्मृतिचिन्ह भेट दिले. ‘जेलर’ सारखा यशस्वी चित्रपट केल्यानंतर रजनीकांत यांनी नुकताच हिमालयात फेरफटका मारला. यामुळे ते चर्चेत आले होते.