Diwali at Shivaji Park: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या दिवाळीतही शिवाजी पार्क मैदानावर 'दीपोत्सव' आयोजित केला आहे. तुळशीच्या लग्नापर्यंत हा दीपोत्सव चालणार आहे. या निमित्त संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच या उत्सवाचा शुभारंभ झाला.