Ganesh Chaturthi 2023: बॉलिवूडची स्टार अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या चित्रपट आणि व्यावसायिक आयुष्यात कितीही व्यस्त असली तरीही परंपरा विसरलेली नाही. अभिनेत्री प्रत्येक हिंदू सण विशेषत: गणेशोत्सव जल्लोषात साजरा करते. आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिने आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. एक दिवस आधी गणपती बाप्पाचे आगमन शिल्पा शेट्टीच्या घरी झाले आहे. यावेळी तिच्यासोबत पती राज कुंद्रा, मुलगा वियान देखील उपस्थित होता.