bharat jodo yatra in telangana : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणातून प्रवास करत आहे. आज सकाळी जेव्हा पदयात्रा धर्मपुरात पोहचली तेव्हा राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी लोकांनीही हजेरी लावली. यावेळी राहुल गांधींनी आदिवासींसोबत कोम्मू-कोया हे पारंपरिक नृत्य केलं. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आदिवासी हे भारतीय संस्कृती आणि विविधतेचे भांडार असून त्यांची कला आणि मूल्यं आपण जपायला हवीत, असं राहुल गांधी म्हणाले.