Rahul Gandhi Speech In Lok Sabha : काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावर खासदार राहुल गांधी यांनी आज भाषण केलं आहे. मणिपूर हिंसाचार आणि हरयाणातील हिंसक घटनांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहे. तुम्ही लोकांना मारून हिंदुस्थानची हत्या केली आहे, तुम्ही देशद्रोही आहात. पंतप्रधान हिंसाचारग्रस्त मणिपुरात का जात नाहीये?, असा सवाल राहुल गांधी यांनी लोकसभेतून केला आहे.