Rahul Gandhi on karnataka results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला असून काँग्रेसनं निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. त्यावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. कर्नाटकात प्रचंड मोठे रोड शो व सभा घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कर्नाटकातील जनता, काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत, त्यांचं अभिनंदन केलं आहे. कर्नाटकातील निवडणुकीत एका बाजूला क्रॉनी कॅपिटलिस्टची ताकद होती, दुसऱ्या बाजूला जनतेची ताकद होती आणि जनतेनं त्यांना हरवलं. आम्ही प्रेमानं ही लढाई लढली. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाचं दुकान उघडलं आहे, असं टोला राहुल गांधी यांनी भाजपला हाणला.