Rahul Gandhi on Agniveer Scheme : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राजस्थानमधील अनुपगड इथं जाहीर सभा घेतली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारनं लष्करी भरतीसाठी आणलेल्या अग्निवीर योजनेवर आसूड ओढले. यापूर्वी शहीद सैनिकाला शहिदाचा दर्जा, भरपाई आणि पेन्शन दिलं जात असे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं अग्निवीर योजना आणून हे सगळं बंद करून टाकलं. अग्निवीर या योजनेला खुद्द लष्कराचाच विरोध होता. मात्र, मोदींनी ही योजना पंतप्रधान कार्यालयातून लादली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आमचं सरकार येताच अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असा शब्द राहुल गांधी यांनी यावेळी दिला.