Rahul Gandhi With Priyanka Gandhi In Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिल्लीतून उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे. यावेळी कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या देखील पदयात्रेत सहभागी झाल्या. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी भारत जोडो यात्रेनिमित्त बाहेरच्या राज्यात प्रवास करत असल्यानं त्यांना लाडक्या बहिणीला भेटणं शक्य होत नव्हतं. त्यामुळं अनेक दिवसांनंतर उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी भेटल्यावर राहुल गांधी भावूक झाले. त्यावेळी त्यांनी प्रियांका गांधी यांच्या गळ्यात हात घालून गालाचं चुंबन घेत बहिणीबद्दलचा ममत्वभाव व्यक्त केला आहे. अनेक दिवसांनी भेटल्यामुळं दोघांनीही आनंद व्यक्त केला. त्यानंतर आता दोघांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.