Rahul Gandhi Lok Sabha Speech : ईशान्येकडील मणिपूर या राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जेव्हा मी मणिपुरचा दौरा केला, त्यावेळी मी तेथील महिलांशी चर्चा केली. त्यावेळी महिलांनी तेथील घटनांचं सत्य मला सांगितल्यानंतर मी हादरून गेलो. एका महिलेच्या मुलाला गोळ्या घालून संपवण्यात आलं होतं. त्यानंतर ती महिलेने केवळ कपडे सोबत घेत घर सोडलं. मी पुन्हा मणिपुरात जाणार असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार टीका केली आहे.