Budget session 2024 : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधींनी अर्थसंकल्प सादर होण्याआधी पार पडणाऱ्या हलवा समारंभाचा उल्लेख केला. त्यांनी सभागृहात हलवा समारंभाचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला. 'अर्थसंकल्पाचा हलवा वाटला जात असल्याचा फोटो दाखवत राहुल गांधी म्हणाले की, या फोटोत ओबीसी, आदिवासी आणि दलित अधिकारी दिसत नाहीत. हे काय सुरु आहे? असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींचे भाषण ऐकून सीतारमन यांनी हसत दोन्ही हात कपाळावार मारले.