Raghuram Rajan Join Bharat Jodo Yatra : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला आहे. यावेळी ते राहुल गांधींसोबत चालताना दिसले. त्यानंतर त्यांनी थेट हायवेवर खुर्च्या टाकून गप्पा मारल्या. त्यात त्यांनी देशातील बेरोजगारी, लघु उद्योग, वस्त्रोद्योग, आर्थिक नियोजन, आर्थिक विषमता, महागाई आणि व्याजदर या विषयांवर निवांत चर्चा केली आहे.