अदानी प्रकरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत काही प्रश्न उपस्थित केले. उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी किती वेळा एकत्रित परदेश दौऱ्यावर गेले, अदानी यांनी भाजपला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून किती पैसे दिले याचा तपशील राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे मागितला.