Bhatghar Dam: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात गेले आठ दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं येथील ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) हे शंभर टक्के भरले असून शुक्रवारी त्यातून पाणी सोडण्यात आलं. धरणाला एकूण ८१ मोऱ्या असून त्यातील ४५ स्वयंचलित आहेत. या स्वयंचलित मोऱ्यांतून ७ हजार ५२१ क्युसेकने नीरा नदीत पाणी सोडलं जात आहे.