Pune Crime : पुण्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात गैरप्रकार टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हेगारांची धिंड काढून त्यांना तंबी दिली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे.