PM Narendra Modi in Shirdi - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. पंतप्रधानांनी शिर्डीत उभारण्यात आलेल्या नवीन दर्शन रांग संकुलाचे उदघाटन केले. येथे १० हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह सुसज्ज प्रतिक्षालय उभारण्यात आले आहे. यामध्ये कपडे बदलण्यासाठी खोल्या, स्वच्छतागृह, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इत्यादी सुविधांची तरतूद आहे. ऑक्टोबर २०१८मध्ये या दर्शन रांग संकुलाची पायाभरणी झाली होती.