Prathamesh Parab Wife Ukhana: ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. शाही लग्न सोहळ्यानंतर क्षितीजा आणि प्रथमेश यांचा गृहप्रवेश झाला. यावेळी क्षितीजाने प्रथमेशसाठी खास उखाणा घेतला. या एकाच उखाण्यात प्रथमेश परब याने आतापर्यंत केलेल्या सगळ्या चित्रपटांची नावं तिने घेतली. क्षितीजाचा हा उखाणा सध्या तुफान व्हायरल होत आहे.