Prakash Ambedkar On New Parliament Building: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे. देशात आदिवासींना स्थान नाही, असा संदेश यातून देण्यात आला असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. २०२४ मध्ये भाजपचा पराभव करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे पुन्हा उदघाटन करू, अशी घोषणा आंबडकर यांनी केली आहे.