Bhishi Mitra Mandal Marathi Movie: आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘भिशी मित्र मंडळ’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुणे येथे सुरुवात झाली असून, त्यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.