Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, प्राजक्ताने कवयित्री आणि उद्योजिका म्हणून देखील तिने आपलं नाव मोठं केलं आहे. तिचा पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड ‘प्राजक्तराज’ अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. सध्या प्राजक्ता माळी ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसोबत सिंगापूरमध्ये एन्जॉय करत आहे. याच दरम्यान तिने एक नवा दागिना लाँच केला आहे.