Narendra Modi at Lepakshi : अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी देशातील विविध भागातील राम आणि रामायणाशी संबंधित मंदिरांना भेटी देऊन पूजा करत आहेत. मोदींनी आज कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेवरील लेपाक्षी येथे जाऊन वीरभद्र देवतेची पूजा केली. रामायणानुसार, रावणाशी लढताना जटायू येथे पडले होते. लेपाक्षी ते क्षेत्र आहे जिथे रामाची जटायुशी भेट झाली होती