Pm Narendra Modi On Manipur Violence : मणिपुरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मणिपुरमध्ये जमावाकडून तीन महिलांची नग्न धिंड काढत बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पीएम मोदींनी म्हटलं आहे. तसेच अशा घटनांमुळे देशाची मान खाली जात असून सभ्य समाजासाठी ही लाजीरवाणी घटना आहे. मणिपुरमधील मुलींसोबत जे झालं त्याला कधीही माफ केलं जाणार नाही, सरकार पुर्ण शक्तीने आणि सक्तीने आरोपींवर कारवाई करणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.