पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. मनूच्या या यशानंतर देशभरात जल्लोष होत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मनूचे फोनवर कौतुक केले आहे. मनू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बराच वेळ संवाद साधला. दरम्यान, जागतिक नेमबाजीत मनू भाकरने आतापर्यंत दोन सांघिक पदके मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला ९ सुवर्ण आणि दोन रौप्य पदके मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेले आहे.