बी-टाऊनमधून एकामागून एक गुडन्यूज ऐकायला मिळत आहेत. अभिनेत्री यामी गौतम प्रेग्नंट असल्याचे समोर आल्यानंतर रिचा चढ्ढा आणि दीपिका पादुकोण यांनीही आपण आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर आता आणखी एक अभिनेत्री आई होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नुकतेच लग्न झालेली अभिनेत्री परिणीती चोप्रा गर्भवती असल्याचे म्हटले जात आहे. सध्या परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांना ती प्रेग्नंट असल्याचे वाटू लागले आहे.