maharashtrachi hasyajatra: नुकताच अभिनेता प्रसाद खांडेकर याचा वाढदिवस झाला. यावेळी हास्यजत्रेतील सर्वच कलाकार मंडळींनी त्याला हटके शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान प्रसादने हास्यजत्रेतील मंडळींना वाढदिवसाची पार्टी म्हणून पाणीपुरीचा बेत आखला होता. कलाकारांनी सोशल मीडियावरुन पाणीपुरी एन्जॉय करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. सेटवर असल्याने तिथेच पाणीपुरी खाता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सगळ्यांनी खूप धमाल केली.