Pakistani Cricket Team in India : आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तानातून विशेष विमानाने बाबरचा संघ हैदराबाद विमानतळावर उतरला आहे. यावेळी कर्णधार बाबर आजम, मोहम्मद रिजवान, हारिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान हे खेळाडू व्हिडिओत दिसून येत आहे. एएनआयने पाकिस्तानी खेळाडू हैदराबादेत दाखल झाल्याचा व्हिडिओ शेयर केला आहे.