Mumbai-Pune expressway accident : लोणावळ्याजवळील ओव्हरब्रिजवर ऑइल टँकरचा भीषण अपघात झाला असून टँकरने पेट घेतला आहे. या पुलाच्या खाली देखील अपघात झाल्याची माहिती आहे. यात अनेक गाड्या पेटल्या असून या अपघातात ३ जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दोघे जण जखमी झाले आहेत.