Nupur Shikhare And Ira Khan Wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्याशी लग्नगाठ बांधली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ३ जानेवारी रोजी ताज लँड येथे हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी आमिर खानचा होणारा जावई नुपूर हा शॉर्ट, ब्लॅक टीशर्ट आणि स्पॉर्ट्स शूज अशा लूकमध्ये तब्बल ८ किलोमीटर धावत लग्नाच्या ठिकाणी पोहोचला होता. फिटनेस ट्रेनर असणाऱ्या नुपूर शिखरे याने स्पोर्टी लूकमध्येच आयरासोबत लग्नगाठ बांधली.