आरस्पानी सौंदर्य आणि आपल्या डान्सने अनेकांच्या मनावर राज्य करणारी बेली डान्सर म्हणजे नोरा फतेही. तिचा बोल्ड अंदाज आणि डान्स मूव्हने ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. एक साधी बेली डान्सर ते कार्यक्रमात परिक्षक इथपर्यंत नोराने पल्ला गाठला आहे. सध्या सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती मुंबई मेट्रोमध्ये डान्स करताना दिसत आहे.