सध्या सगळीकडे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. ग्रँड प्रीवेडींग कार्यक्रमानंतर आता अंबानी कुटुंबीय राधिकाचे स्वागत करण्यासाठी तयार झाले आहेत. अंबानी कुटुंबीय लग्नाची जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे. नीता अंबानी या मुलाची पत्रिका काशी विश्वनाथाच्या चरणी ठेवण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा वाराणसीमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.