Supriya Sule on Badlapur : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यात महिला अत्याचारात वाढ झाली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुळे यांनी केली आहे.