Actor Raqesh Bapat: अभिनेता राकेश बापट हा जितका उत्कृष्ट अभिनय करतो, तितकाच तो एक चांगला मूर्तीकार देखील आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. अभिनेता राकेश बापट हा दरवर्षी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती बनवतो. राकेश बापट गणपती बाप्पाचा मोठा भक्त आहे. आता त्याने त्याच्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या सेटवर देखील बाप्पाची मूर्ती घडवली आहे. यासोबतच आता जहागीरदारांच्या घरात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे.