चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच दिल्लीमधील विधान भवन येथे पार पडला. यंदाच्या ६९व्या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या कलाकारांना पुरस्कार देण्यात आला हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टला यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.