Narendra Modi in Kala Ram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मोदींनी राम कुंडावर जलपूजन केलं. गोदावरी नदीच्या तीरावर जलपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. तसंच नाशिकच्या प्रसिद्ध काळा राम मंदिरात त्यांनी पूजा आणि महाआरती केली. यावेळी त्यांनी स्वच्छता मोहीमही राबवली. मंदिरात स्वच्छता करताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोदींनी मंदिरातील भजनातही सहभाग घेतला.