Shark tank India season 3: 'शार्क टँक इंडिया'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुन्हा एकदा या शोने छोट्या पडद्यावर कल्ला केला आहे. या शोची परीक्षक नमिता थापर हिने नुकताच सेटवर धमाल करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नमिता थापर तिच्या सहपरीक्षकांसह धमाल डान्स करताना दिसली आहे.