Munawar Faruqui: ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी जिंकल्यामुळे सध्या मुनव्वर फारुकी प्रचंड चर्चेत आहे. दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चांमुळे देखील तो प्रसिद्धी झोतात आहे. ;बिग बॉस’च्या घरात असताना मुनव्वरच्या अफेअर्समुळे चांगलाच गदारोळ माजला होता. आता घराबाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा मुनव्वर प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. नुकतीच मुनव्वरने ऑरीच्या पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री सुष्मिता सेन हिची मुलगी रेने आणि मुनव्वर एकत्र दिसले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे.