मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

16 March 2023, 15:36 IST Haaris Rahim Shaikh
16 March 2023, 15:36 IST
  • मुंबईतील अनिल जयसिंघानी नावाच्या सध्या फरार असलेल्या बुकीची मुलगी अनिक्षा हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. अनिक्षा या महिलेने अमृता फडणवीस यांच्याशी २०१४-१५ पासून मैत्री केली. मैत्रीचा फायदा घेत बुकी अनिल जयसिंघानी याला काही गुन्हे प्रकरणातून सोडवण्यासाठी १ कोटी रुपयाची लाच देऊ केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Readmore