Mrunmayee Deshpande Farming: आपल्या दमदार अभिनयाने सगळ्या रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या शेतीत रमली आहे. कामातून ब्रेक घेऊन मृण्मयी सध्या पती स्वप्नील राव यांच्यासोबत महाबळेश्वरमध्ये शेतीत काम करत आहे. महाबळेश्वरमध्ये त्यांचं शेत असून, यात त्यांनी वेगवेगळ्या भाज्या आणि स्ट्रॉबेरी लावल्या आहेत. थंडीचा मोसम सुरू झाल्यावर आता स्ट्रॉबेरी काढण्याची वेळ आली आहे. याचीच एक झलक आता अभिनेत्रीने दाखवली आहे.