पावसाळ्यात बाहेर येता जाता आपले केस भिजतात. केस भिजल्यामुळे अधिक तुटतात. हे टाळायचे असल्यास केस पावसात भिजल्यावर घरी आल्यानंतर लगेच स्वच्छ पाण्याने केस धुवावेत. हीट स्टाइलमुळे पावसाळ्यात तुमच्या केसांचे आणखी नुकसान होऊ शकते. फ्लॅट आयर्न, कर्लिंग आयर्न किंवा ब्लो ड्रायर्स सारख्या हीट टूल्सचा वापर कमीत कमी करा.