Varun Dhawan And Natasha Dalal: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री नताशा दलाल यांच्या लग्नाला आता बराच काळ लोटला आहे. दोघेही बी-टाऊनचे खूप लोकप्रिय कपल आहेत. गेल्या काही दिवसांपासून वरुण आणि नताशा चाहत्यांना गुडन्यूज देणार अशी चर्चा सुरू होत्या. अखेर आता अभिनेत्याने चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी आपण आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. या दरम्यानच आता ही जोडी अभिनेत्री रकुलप्रीत हिच्या लग्नासाठी गोव्याला रवाना झाली आहे.