भारतीय इंडस्ट्रीमध्ये पाकिस्तानी कलाकारांना प्राधान्य देऊ नका असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनापक्षाने कायमच म्हणणे असते. पुलवामा हल्ला झाल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना सतत विरोध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात होता. आता यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेळ आली तर या चित्रपटांना विरोध करण्यासाठी कडक आंदोलन करु असे मनसे नेत्याने म्हटले आहे.