Asaduddin Owaisi : ‘खुर्चीसाठी तुम्ही शहिदांच्या रक्ताची होळी खेळलात’, ओवेसींचा सत्यपाल मलिकांवर गंभीर आरोप
- Asaduddin Owaisi On Satyapal Malik : मोदी सरकारच्या चुकांमुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा खळबळजनक आरोप जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. त्यानंतर आता एआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सत्यपाल मलिक यांच्या आरोपांचा समाचार घेत या प्रकरणावर इतक्या दिवस का चुप्पी साधली होती?, असा सवाल केला आहे. राज्यपालपदासाठी भारताच्या शहिदांच्या रक्ताची होळी खेळली गेल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.