Fire Incident In Piyush Jewellers Pune : पुण्यातील वानवडी परिसरातील पीयूष ज्वेलरी शॉपमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीताहानी झाली नाही. परंतु ज्वेलरी शॉपमधील लाखो रुपयांचं साहित्य आणि दागिने बेचिराख झाले आहे. त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.