bangalore fire incident today : कर्नाटकची राजधानी बंगळुरुतील एका हुक्का बारमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कोरमंगला भागातील कॅफेत ही आग लागली असून त्यात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु इमारतीतल्या कोट्यवधींच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांची घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं असून कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे.