अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या काही चांगल्या-वाईट गोष्टींवरही तो भाष्य करतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने गोरेगाव फिल्मसिटी बाहेरील कचरा पाहून संताप व्यक्त केला आहे.