Supriya Pathare birthday: नुकताच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा वाढदिवस झाला. सुप्रिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या लाखो चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. अंशुमन विचारेनेही सुप्रिया यांना वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज देत त्यांचा वाढदिवस साजरा केला. अंशुमनने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात अंशुमन आपल्या कुटुंबासह सुप्रिया यांच्या घरी जात त्यांना सरप्राईज देत असल्याचे पाहायला मिळत आहे.