Actress Sai Tamhankar: चैत्राची म्हणजेच हिंदू नवं वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते. या दिवशी वर्षाचा पहिला दिवस म्हणून लोक वेगवेगळे संकल्प करतात. कलाकारही यामध्ये मागे नाहीत. आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकरने हिने देखील असाच एक संकल्प घेतला आणि तो पूर्णही केला. सईने मराठी नवीन वर्षात एक नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे. तिने गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.