Marathi Actress on Times Square: ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत अप्पूच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसलेली ‘नेत्रा’ आठवतेय का? ही भूमिका अभिनेत्री प्रांजल आंबवणेने साकारली होती. सध्या प्रांजल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे तिच्या वाढदिवशी नवऱ्याने तिला खास सरप्राईज दिलं आहे. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या स्क्रीनवर आपले फोटो झळकल्याने ती भलतीच खूश झाली आहे. प्रांजलने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिला मिळालेलं हे स्पेशल सरप्राईज दाखवलं आहे.