Marathi Actress Kranti Redkar: अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे या जोडीला जुळ्या मुली आहेत. क्रांतीने आपल्या लेकींचे चेहरे दाखवले नसले तरी, ती नेहमीच त्यांच्या गंमतीजमती सांगत असते. नुकतीच तिने आपल्या लेकीची छबिलची एक धमाल गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. क्रांतीच्या मुलीचा हा गोड किस्सा ऐकून आता चाहते देखील तिचे कौतुक करत आहेत.