Subodh Bhave: अभिनेता सुबोध भावे नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. सुबोध भावे याने आजवर त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर देखील भरपूर सक्रिय असतो. नेहमीच तो सोशल मीडियावरुन त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अशातच सुबोधने शेअर केलेल्या एका व्हिडीओने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ सुबोधने त्याच्या प्रेमाची गोष्ट असल्याचे म्हणत शेअर केला आहे.